अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या विरोधात गुन्हा


Minor girl molested in Parola taluka पारोळा : तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत तरुणाने विनयभंग केला. या प्रकरणी पारोळा पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
पारोळा तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासह वास्तव्यास असून रविवार, 16 रोजी मुलीचे आई व वडील शेतात कामानिमित गेल्यानंतर संशयीत आरोपी संदीप रवींद्र पाटील हा पीडीत मुलीच्या घरी दाखल झाला व इर्न्व्हटरची चिठ्ठी मागितली व यानिमित्ताने मुलीचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी पारोळा पोलिसात संशयीत आरोपी संदीप पाटील याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !