Head-on collision between speeding two-wheelers : Youth of Savada killed on the Spot भरधाव दुचाकींची समोरा-समोर धडक : सावद्यातील युवक जागीच ठार
Head-on collision between speeding two-wheelers : Youth of Savada killed on the Spot सावदा : सावदा-कोचुर रोडवर दोन दुचाकींची समोरा-समोर जोरदार धडक होवून सावद्यातील तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. हा अपघात गुरुवार, 20 रोजी सकाळी साडेअकरा ते 12 वाजेच्या सुमारास घडला. दुचाकी क्रमांक (एम.एच.15 डी.व्ही.1306) व (एम.एच.19 डी.जी 8467) या क्रमांकांच्या मोटार सायकलींची समोरासमोर जेरदार धडक झाल्याने या अपघातात कुणाल मधुकर साळी (सावदा) या तरुणाचा मृत्यू झाला तर यश किशोर धांडे आणि पुष्कर हेमा बढे (चिनावल, ता.रावेर) हे जखमी झाले.
तरुणाच्या मृत्यूने सावद्यात शोककळा
अपघातात जखमी झालेल्या दोघा तरुणांवर फैजपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मयत झालेला तरुण कुणाल साळी हा महावितरणमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होता. तरुणाच्या अपघाती मृत्यूने सावदा शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तरुणाच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परीवार आहे.
