Death of bike rider in Savada due to app blowing : Crime against one अॅपेने उडवल्याने सावद्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू : एकाविरोधात गुन्हा
Death of bike rider in Savada due to app blowing : Crime against one सावदा : भरधाव अॅपे रीक्षाने धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 29 सप्टेंबर 2022 रोजी घडला. सावदा पोलिसात या प्रकरणी अॅपे चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
अॅपे मालवाहू रीक्षा (एम.एच.19 एस.3403) वरील अज्ञात चालकाने भरधाव वाहन चालवत दुचाकीस्वार मोहन रामदास बेंडाळे (58, प्लॉट एरीया, सावदा) यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. ही घटना 29 सप्टेंबर रोजी आठ वाजता घडली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गणेश चंद्रकांत बेंडाळे (28, प्लॉट एरीया, सावदा) यांच्या फिर्यादीवरून वरील अज्ञात अॅपे चालकाविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
