दीपनगरातून 48 हजारांच्या अ‍ॅल्युमिनिअम प्लेट लांबवल्या : दोघांविरोधात गुन्हा


Aluminum plates worth 48,000 were stolen from Deepnagar : Crime Against Two भुसावळ : दीपनगर 210 प्रकल्पातील सरगम गेटजवळ 48 हजार रुपये किंमतीच्या अ‍ॅल्यूमिनीअम प्लेट चोरी झाल्याची घटना बुधवार, 19 रोजी 8.40 वाजेच्या सुमारास घडली. सुरक्षा रक्षकांनी धाव घेत संशयीतांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र संशयीत भिंतीवरून उडी टाकून पसार झाले. या प्रकरणी तालुका पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एका संशयीताला अटक करण्यात आली.

प्लेट चोरताना संशयीत जाळ्यात
210 प्रकल्पाच्या सरगम गेटजवळ बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संशयीत विनोद युवराज मोरे व आनंद टेकाळे (निंभोरा, ता.भुसावळ) यांनी भिंतीवरून उडी मारत प्रकल्पात प्रवेश करीत अनुक्रमे 16 व 32 हजारांच्या अ‍ॅल्यूमिनीअम प्लेट चोरत त्या भिंतीवरून बाहेरच्या दिशेने फेकल्या.

एका संशयीतीला अटक
याबाबतची माहिती कळताच कनिष्ठ सुरक्षा अधिकारी अनिकेत चंद्रकांत काणेकर, हितेश महाजन व प्रमोद कोळी यांनी धाव घेतली मात्र तोपर्यंत संशयीतांनी भिंतीवरून उड्या टाकत पळ काढला. या प्रकरणी अनिकेत काणेकर यांच्या फिर्यादीनुसार दोन्ही संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद मोरे यास तालुका पोलिसांनी अटक केली आहे. तपास नाईक योगेश पालवे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !