शेतकर्याला खळ्यात बांधत चोरट्यांनी 70 हजारांच्या म्हशी लांबवल्या : वरणगाव परीसरातील घटना
By tying the farmer in the barn, the thieves stole buffaloes worth 70,000 : Incident in Warangaon Area भुसावळ : तालुक्यातील आचेगाव-गोळेगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातून चोरट्यांनी 70 हजारांचे पशूधन लांबवल्याची घटना बुधवार, 19 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे चोरट्यांनी शेतकर्याला शेतात बांधून ठेवत पशूधन लांबवले. या प्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
70 हजारांचे पशूधन लांबवले
शेतकरी विठ्ठल लक्ष्मण भोळे (आचेगाव, ता.भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, आचेगाव-गोळेगाव रस्त्यावरील शेतातील दोन अज्ञात चोरट्यांनी 70 हजार रुपये किंमतीच्या तीन म्हशी लांबवल्या. याबाबत वरणगाव पोलिसात माहिती दिल्यानंतर सर्वत्र चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला तर चोरटे मात्र पसार होण्यात यशस्वी झाले तर म्हशी मात्र आढळल्याने त्या शेतकर्याच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक परशूराम दळवी करीत आहेत.
