शेतात बैलगाडी नेण्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण : सहा जणांविरोधात गुन्हा
An old man was brutally beaten due to a dispute over taking a bullock cart to the farm: a case against six people धरणगाव : शेतातून बैलगाडी नेल्याच्या कारणावरून वयोवृध्दाला सहा संशयीतांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बोरखेडा येथे घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
धरणगाव पोलिसात गुन्हा
शेतकरी वसंत जयराम पाटील (65, बोरखेडा, ता.धरणगाव) यांनी स्वप्नील उर्फ पन्नालाल गोरख पाटील यांच्या शेतातील बैलगाडी चोरून नेल्याच्या आरोपातून स्वप्नील उर्फ पन्नालाल गोरख पाटील, गोरख जयराम पाटील, अरूण जयराम पाटील, आशाबाई गोरख पाटील, लताबाई अरूण पाटील, अतुल अरूण पाटील (रा.बोरखेडा, ता.धरणगाव) यांनी शिविगाळ करून बेदम मारहाण केली. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार मोती पवार करीत आहे.
