सातपुडा हाऊसिंग सोसायटीत माथेफिरूचा प्रताप : दोन कारसह दुचाकीला लावली आग


In Jalgaon, Mathefiru burnt two cars along with a bike जळगाव : शहरात वाहनांना आग लावण्याचे सत्र थांबलेले नाही. मध्यरात्रीच्या सुमारास विकृत वाहने पेटवत असल्याने वाहनधारक कमालीचे धास्तावले आहेत. जळगावच्या गणपती नगरातील सातपुडा हाऊसिंग सोसायटीतील दोन कारसह दुचाकीला पेटवून देण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे 3.30 वाजता उघडकीस आला. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाच गल्लीतील तीन वाहने पेटवली
जळगावच्या गणपती नगरातील सातपुडा हाउसिंग सोसायटीतील मिलन सलामतराय तलरेजा (30) यांच्या कार (एम.एच.19 डी.व्ही.4193) ला शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता अज्ञात माथेफिरूने कपड्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. शेजार्‍यांनी ही माहिती दिल्यानंतर तलरेजा यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र या आगीमध्ये कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तलरेजा यांनी आठ महिन्यापूर्वीच हे कार विकत घेतली आहे. शिवाय याच गल्लीतील श्रीचंद घनश्यामदास अडवाणी (47) यांची कार (एम.एच.19 सी.झेड.2277) व इलेक्ट्रॉनिक दुचाकी (एम.एच.19 डी.झेड.7244) देखील अशाच पद्धत्तीने पेटवून देण्यात आले. या संदर्भात मिलन तलरेजा यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी सकाळी 9 वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !