One committed suicide by hanging himself in Hingona हिंगोणा येथे गळफास घेत एकाची आत्महत्या


One committed suicide by hanging himself in Hingona यावल : तालुक्यातील हिंगोणा गावातील बाळू उखा कोळी (50) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवार, 28 रोजी ही घटना उघडकीस आली. आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.

राहत्या घरात केली आत्महत्या
हिंगोणा रहिवासी बाळू कोळी यांनी शुक्रवार, 28 रोजी सकाळी सहा वाजेदरम्यान डोंगरहाळ परीसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणार्‍या बाळू कोळी यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही. विलास कोळी यांच्या खबरीवरून फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार देविदास सूरदास व हवालदार बर्‍हाटे करीत आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !