अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत मारहाण : त्रिकूटाविरोधात गुन्हा


A Minor Girl Molested and Beaten : Crime Against The Trio चोपडा : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला तसेच याबाबत जाब विचारल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांविरोधात अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
चोपडा तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासह वास्तव्यास आहे. गुरुवार, 27 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या आई व मावशीसह शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली तसेच मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी दीपक भीमा ठाकरे, संदीप भीमा ठाकरे व समाधान विक्रम ठाकरे यांच्याविरोधात अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एएसआय जगदीश कोळंबे हे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !