प्रेयसीला देण्यासाठी 20 लाख न आणल्याने रावेरातील विवाहितेचा छळ : प्रेमिका, पतीसह आठ संशयीतांविरोधात गुन्हा
Harassment of married woman in Rawer for not bringing 20 lakhs to give to girlfriend: Case against eight suspects including girlfriend, husband रावेर : विवाहितेने घटस्फोट घ्यावा तसेच पतीचे प्रेम संबंध असलेल्या महिलेला 20 लाख रुपये देण्यासाठी माहेरून पैसे आणावेत म्हणून रावेरातील विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी प्रेमिका, पतीसह आठ संशयीतांविरुध्द रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या विरोधात गुन्हा
रावेरातील उटखेडा रोडवरील शिक्षक कॉलनीतील 27 वर्षीय रहिवासी विवाहितेने याबाबत तक्रार दिली आहे. विवाहितेचा पती गौरव सोपान पाटील (दिघी, पुणे), सासरे सोपान भिका पाटील, सासू प्रतिभा सोपान पाटील (शेमलदा, ता.मुक्ताईनगर), नणंद शीतल नारायण पाटील, नंदोई नारायण निवृत्ती पाटील (पिंप्री सौदागर, जि.पुणे), लहान नणंद स्नेहल मनेश पाटील, नंदोई मणेश गोपाळराव पाटील (सुंदर मोती नगर, सावखेडा शिवार जळगाव), चुलत नणंद मनीषा निलेश पाटील (मोरगाव, ता.रावेर) व खुशी उपाध्याय (विमाननगर, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रेमसंबंध असताना केला विवाह
संशयीतांनी सासरकडील मंडळीच्या मागणी प्रमाणे तीन लाखांचे स्त्री धन म्हणून सोन्याचे दागिने व सहा लाख रुपये रोख रक्कम देण्यात आले तसेच फिर्यादी विवाहितेचा पती गौरव पाटील याचे दुसर्या मुलीशी प्रेम संबंध असताना वरील आरोपींनी विवाह घडवून आणला. आरोपींनी विवाहितेस घटस्फोट दे किंवा प्रेम संबंध असलेल्या महिलेला 20 लाख रूपये देण्यासाठी माहेरहून रककम घेवून ये, अशी मागणी पतीसह सासरच्या लोकांनी वारंवार केली व विवाहितेला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच गांजपाट करून शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
