मोहराळा येथे पुन्हा लंम्पीमुळे शेतकर्‍याच्या बैलाचा मृत्यू

दोन दिवसात दोन बैल दगावले : पशूधनावर कोसळले संकट


A farmer’s bull died due to lumpy again in Moharala यावल : तालुक्यातील मोहराळा येथे दोन दिवसात लंम्पी मुळे दोन बैल दगावल्याची घटना घडल्यने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. लंम्पीवर उपचार सुरू असतांना बैलांच्या मृत्यूमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.

लंम्पीचा प्रादुर्भाव वाढला
मोहराळाख, ता.यावल येथे गावात लंम्पीचा पार्दुभाव वाढतांना दिसत आहे दोन दिवसात येथे दोन बैल दगावले आहेत. शुक्रवारी येथे एक बैल दगावला होता व पुन्हा शनिवारी गावातील शेतकरी प्रकाश जिजाबराव पाटील यांच्या 50 हजार रूपये किंमतीच्या बैलाचा लम्पीवर उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. या बाबत पशुधन विकास अधिकारी कार्यालय यावलचे डॉ. एस.एन. बढे यांना माहिती देण्यात आली. गावात डॉ. राजू सुशिल, सहाय्यक युवराज अडकमोल यांनी येवून मृत बैलाचा पंचनामा केला व नंतर शवविच्छेदन करून बैलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लंम्पी मुळे गावात दोन दिवसात दोन बैल दगावाल्याने पशु पालक व शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. लंम्पी मुळे बैल दगावल्याने शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !