बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर : निसर्ग कॉलनीतून घरातून 45 हजारांचा ऐवज लांबवला


Closed houses targeted by thieves : 45,000 compensation was extended from the house in Nisarga Colony जळगाव : शहरातील श्रीराम चौकातील निसर्ग कॉलनी येथील बंद घर फोडून चोरट्यांनी 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला. शुक्रवारी दुपारी चार वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना आयतीच संधी
दीपाली सतीश सोनवणे (33 रा. श्रीराम चौक, निसर्ग कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तवाला आहे. दिवाळीनिमित्त महिला घर बंद करून बाहेरगावी गेल्यानंतर 4ाज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील 20 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघड केला आला आहे. या संदर्भात महिलेने शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !