जळगाव लाच लुचपत विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरुवात
जळगाव : जळगाव एसीबीतर्फे 31 ऑक्टोबर 2022 ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनातर्फे राज्यात दरवर्षी एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे (विजिलन्स अवेरनेस विक) आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने जळगाव एसीबीनेही आयोजन केले आहे.,
शपथेनुसार कार्यक्रमाला प्रारंभ
सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता भ्रष्ट्राचार निर्मुलनाची शपथ घेवुन कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. त्यानंतर मा. राज्यपाल यांनी या सप्ताहनिमित्त दिलेला संदेश वाचन करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट पद्धतीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जागरुकता मोहिम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आपले शासकीय काम करुन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच देण्याची आवश्यकता नाही. परंतु काही वेळेस सर्वसामान्य नागरीकांना असे वाटते की, शासकीय कार्यालयातील काम फक्त लाच दिल्यावरच कार्यान्वीत होते. या धारणेला बदलण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नागरीक शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार नष्ट करण्यास मदत करु शकतात. त्या अनुषंगाने दक्षता जनजागृती सप्ताह अंतर्गत अॅन्टी करप्शन ब्युरो विभागाची कार्यप्रणाली, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती आणि अंमलबजावणी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जळगांव जिल्ह्यातील शासकीय कार्यालये / शाळा / महाविद्यालये / ग्रामीण भागात भ्रष्टाचाराच्या दृष्टपरिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरीकाने भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडविण्यास मदत करुन लाच मागणार्याची माहिती तात्काळ द्यावी.


व्हॉटसअॅप नंबर – 9930997700 टोल फ्रि नंबर – *1064* अँन्टी करप्शन ब्युरो, कार्यालय, जळगांव, दुरध्वनी नंबर – 0257 – 2235477 येथे संपर्क साधावा असे आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो विभागाचे पोलिस उप अधीक्षक शशीकांत पाटील यांनी नागरीकांना केले आहे.