भुसावळात कोळी समाजाच्या मेळाव्यात 300 उपवर-वधूंचा परीचय
भुसावळात आयोजन : उपवर तरुणींना उच्च शिक्षीत तर उपवरांना अनुरूप वधूची अपेक्षा
Introduction of 300 grooms and brides in the meeting of Koli community in Bhusawal भुसावळ : शहरातील कोळी समाज मंगल कार्यालयात रविवारी झालेल्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात 205 मुली तर 95 विवाहोच्छूक मुलांनी परीचय दिला. यावेळी माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, प्रभाकर सोनवणे, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांची येथे उपस्थिती होती.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, प्रभाकर सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, पन्नालाल सोनवणे, वसंत मोंढे, डॉ.दिवाकर पाटील, डॉ.उमेश सपकाळे, राज्यस्तरीय मेेळाव्याचे अध्यक्ष वसंत सपकाळे, नारायण सपकाळे, नितीन सोनवणे, शांताराम सपकाळे, दीपक सोनवणे, महारू कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.


वधू-वर मेळावे काळाची गरज
प्रभाकर सोनवणे म्हणाले की, आपल्या समाजातील मुला-मुलींना शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जावे, समाजाचे नाव मोठे करावे, मुलींनी धीट बनावे, समाजातर्फे दरवर्षा आयोजीत केला जात असलेल्या या वधू-वर परीचय मेळावा ही काळाची गरज आहे. प्रास्ताविक वसंत सपकाळे तर सूत्रसंचालन चंद्रकांत सूर्यवशी यांनी केले.
उच्चशिक्षीत वराची अपेक्षा
वधू-वर परीचय मेळाव्यात उपवर तरुणींनी सॉफ्टवेअर इंजिनियर, नोकरदार तसेच खाजगी कंपनीतील नोकरी करणार्या तसेच पब्लिक सेक्टर, डॉक्टर व व्यावसायीक वराचीअ अपेक्षा केल तर मुलांनी मात्र अनुरूप वधूची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी एका युवकाने इंजिनियर, डॉक्टर, व्यावसायीक या चॉईस ऐवजी दुसरीही चॉईसही करा असा सल्ला दिल्ला.