वादाचा वचपा काढण्यासाठी अकोल्यातील शिवसेना उपशहरप्रमुखाची हत्या : दोघा आरोपींना बेड्या
Shiv Sena sub-city chief killed in Akola To Settle Dispute : Two Accused In Chains अकोला : अकोला शहरातील शिवसेनेच्या ठाकरे गटातील अकोला उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले (26) यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जुन्या वादाचा वचपा काढण्यातून ही हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. जठारपेठ चौकात धारधार चाकूचे वार करीत रविवारी रात्री 7 वाजता कपले यांची हत्या केल्याप्रकरणी अकोट फैल पोलिसांसह रामदासपेठ पोलिसांनी रविवारी रात्री आरोपी शिवानंद मनोहर दोरवेकर (23) व विनोद रमेश कांबळे (22, दोघेही रा.महाकाली मंदिराजवळ, मोठी उमरी) यांना अटक करण्यात आली.
वादातून झाली हत्या
रविवारी सायंकाळच्या सुमारास जठारपेठ चौकात शिवसेनेचे उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले यांच्यावर चार ते पाच हल्लेखारांनी चाकू हल्ला केला. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशाल कपले यांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी विशाल कपले यास मृतक घोषित केले. या आरोपींनी विशालवर लगातार सात वार केल्याने विशालचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही हत्या करणार्यांमध्ये दोघे आरोपी कारंजात असल्याची माहिती रामदासपेठचे ठाणेदार किशोर शेळके यांच्यासह अकोट फैलचे पोलीस निरीक्षक नितीन सुशीर, पोलीस कर्मचारी दीप तराळे, छोटू पवार, प्रशांत इंगळे यांना मिळाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.

