विकासकामे, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार : अ‍ॅड.रोहिणी खडसे


मुक्ताईनगर : रावेर तालुक्यातील हा भाग मुक्ताईनगर मतदारसंघाला जोडल्यापासून एकनाथराव खडसे यांनी प्रत्येक गावाला भरगोस विकास निधी उपलब्ध करून दिला. तुम्ही सर्व जनतेने सुद्धा मतदानातून सदैव एकनाथराव खडसे यांना आशीर्वाद दिला. नाथाभाऊ यांनी गेले 30 वर्ष खेडोपाडी वाड्या-वस्त्यांवर जाऊन भाजप पक्ष वाढविला पण अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली की नाथाभाऊ यांना भाजप सोडण्यास भाग पाडण्यात आले त्याचवेळी शरद पवार यांनी एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊन आमदार बनवले. आतापर्यंत जशी तुम्ही एकनाथराव खडसे यांना साथ दिली तशीच साथ कायम ठेवा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहा, असे आवाहन अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी केले. राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या पंचविसाव्या दिवशी त्यांनी रावेर तालुक्यातील भामलवाडी, पुरी गोलवाडे, सिंगत, बलवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या काही समस्या दूरध्वनी वरून शासकीय अधिकार्‍यां सोबत बोलून तत्काळ मार्गी लावल्या.

यांची होती उपस्थिती
यात्रेत यात्राप्रमुख निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, सोपान पाटील, प्रल्हाद बोडे, रावेर तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, जि.प.सदस्य कैलास सरोदे, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, प्रदीप साळुंखे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा माया बारी आदी सहभागी झाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !