भुसावळातील अलायन्स मराठी चर्चमध्ये गृहसण
भुसावळ : शहरातील अलायन्स मराठी चर्चतर्फे आयोजित गृहसणानिमित्त 3 ते 6 नोव्हेंबर या काळात दररोज सायंकाळी 6.30 वाजता पास्टर मनोज तेलोरे (सोलापूर) यांचे मार्गदर्शन करणार आहे.
असे होतील कार्यक्रम
3 ते 5 नोव्हेंबरला गृहसण सभा होणार आहे, यात पास्टर मनोज तेलोरे हे संदेश वाहक असून पास्टर स्वप्निल नाशिककर यांची उपस्थिती राहील. 6 नोव्हेंबरला प्रभूवार उपासना व प्रभुभोजन सकाळी नऊला, सायंकाळी साडेसहाला गृहसण सभा-कँडल सर्व्हीस व समारोप होणार आहे. उपस्थितीचे आवाहन पास्टर स्वप्निल नाशिककर, अध्यक्ष प्रवीण ओहोळ, फिलीप एस. फ्रान्सीस, प्रेमचंद जाधव, जया फ्रान्सिस मणी यांनी केले आहे.

