भुसावळातील चंद्रशेखर अग्रवाल महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्रीपदी
भुसावळ : महाराष्ट्र राज्य अग्रवाल युवा संमेलनाच्या वतीने नुकतीच धुळ्यातील टॉपलाईन रीसॉर्टमध्ये नुतन कार्यकारणी पदाधिकारी निवड व नूतन जिल्हाध्यक्षांचा शपथविधी पार पडला.
युवा उद्योजक चंद्रशेखर अग्रवाल युवा महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्रीपदी
या कार्यक्रमात भुसावळातील युवा उद्योजक चंद्रशेखर रामेश्वर अग्रवाल यांची महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्रीपदी तसेच जळगाव जिल्हाध्यक्षपदी अंकीत गोपाळ अग्रवाल (पाचोरा) तसेच जळगाव जिल्हा सचिवपदी योगेश श्यामजी अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य अग्रवाल युवा संमेलन प्रदेशाध्यक्ष अभिषेक अनिल अग्रवाल, अग्रवाल समाज प्रदेश महामंत्री कैलाश अग्रवाल व वरीष्ठ पत्रकार किरण अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

