Offensive statement about Minister Gulabrao Patil : Crime against Sharad Koli मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य : शरद कोळींविरोधात गुन्हा
Offensive statement about Minister Gulabrao Patil : Crime against Sharad Koli धरणगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह गुर्जर समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या युवा सेनेचे महाराष्ट्र प्रचारक शरद कोळी यांच्याविरुद्ध व आयोजकांविरोधात गुरुवारी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धरणगाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर सभेत कोळी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप
प्रभूदास उर्फ बालू रोहिदास जाधव (50., लोहारगल्ली, धरणगाव) यांनी धरणगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 1 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 8.30 वाजता धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे सुषमा अंधारे यांच्या महाप्रबेधन यात्रेच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली. या सभेत शरद विठ्ठल कोळी (रा.सोलापूर) यांचे भाषण सुरु असताना त्यांनी आपल्या भाषणात गुर्जर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले तसेच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करीत तसेच त्यांची बदनामी केली.


आयोजकांवरही गंभीर आरोप !
शरद कोळी यांनी हेतुपुरस्कर भावना गुर्जर समाजासह इतर समाजच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच भाषण करत असताना आयोजकांपैकी कोणीही त्यांना आवर घातलेला नाही. उलट त्यांना त्यांना प्रोत्साहन देवून आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकारात आयोजक देखील तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे विठ्ठल कोळी यांनी गुर्जर समाजाबदली अशी अपशब्द व बदनामीकारक, सामाजीक असंतोष तसेच तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून गुर्जर जातीतील सर्व स्त्री-पुरुष व लहान पोरांचा अपमान करत जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत द्वेष भावना वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी 156 अ, 295, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ करीत आहेत.