सावद्यात शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारतींच्या दर्शनार्थ गर्दी


सावदा : संकेश्वर करवीर पीठाधिश्वर श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती महास्वामी यांचे शनिवार, 12 रोजी सकाळी 10 वाजे दरम्यान सावदा शहरातील चितोडे वाणी समाजाचे डोखळे राम मंदिरात आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत धार्मिक वातावरणात भक्तिभावाने करण्यात आले. पाद्यपूजन शैलेश यावलकर व त्यांच्या धर्मपत्नी माया यावलकर यांनी केले.

प्रभू राम तर तारणहार
त्यांनी मंदिरात दर्शन घेतल्यावर उपस्थित भाविकांना समोर प्रवचनात बोलतांना सर्वत्र राम हे असून प्रत्येकाच्या तोंडी राम नाम असणे आवश्यक असून कलियुगात राम नाम हे मनुष्यास तारणारे नाम असल्याचे सांगितले तर देशाचे चलन असलेल्या नोटेवर देखील लवकरच भगवान राम यांचे चित्र दिसेल, अशी अपेक्षा शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती महास्वामी व्यक्त केली.



यांची होती उपस्थिती
यावेळी मंदिरात जिल्हा दूध संघाचे संचालक जगदीश बढे, माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे, माजी नगराध्यक्षा हेमांगी चौधरी, अनिल वाणी, विशाल वाणी, श्रीकांत वाणी, चितोडे वाणी समाजाचे अध्यक्ष सतीश खरे, उपाध्यक्ष अरविंद अकोले, सचिव दीपक श्रावगे, अरविंद वाणी, गजानन भार्गव, महेश अकोले, श्रीकांत वाणी, नितीन खरे, मंगेश वाणी, सुनील वाणी यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते. यानंतर महाराजांनी माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे व शेखर वानखेडे, श्रीकांत वाणी यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. गचके यांचे दत्त मंदीर व सतीश जोशी महाराज यांचे घरी नाथ महाराज यांचे दर्शन घेतले तसेच ठिकठिकाणी त्यांचे स्वागतदेखील करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !