Cruel attack on passengers going to Mumbai : Five people died on the spot in a horrific accident मुंबई जाणार्या प्रवाशांवर क्रुर काळाचा घाला : भीषण अपघातात पाच जण जागीच ठार
Terrible midnight accident on Mumbai-Pune Expressway; Five people died on the spot खोपोली मुंबई येथे जाणार्या प्रवाशांवर क्रुर काळाने घाला घातल्याने पाच जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर आज रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. इर्टीका कारने एका वाहनाला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.
जागीच झाला प्रवाशांचा मृत्यू
सूत्रांच्या माहितनुसार, इर्टिका कार चालक मच्छिंद्र आबोरे (३८, रा.पिंपरी चिंचवड) हे मुंबईच्या दिशेने सहा प्रवाशांना घेवून जात असताना शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या मुंबईपासून अलीकडे बोरघाटात ढेकू गावच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. आतील प्रवासी दरवाजा तुटल्याने बाहेर पडले व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने काही जणांचा तेथेच मृत्यू झाला. कारमधील हे सर्व प्रवासी हे अर्टिगा ह्या चारचाकी वाहनामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईकडे निघाले होते.


अपघातानंतर महामार्ग पोलिसांची धाव
काही वेळातच महामार्गावरील आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केलं. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, रस्त्यातच आणखी एकाचा मृत्यू झाला. सध्या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.