भुसावळात आदिवासी बांधवांच्या एल्गार मोर्चाने वेधले लक्ष

जय मातृभूमी पक्षातर्फे प्रशासनाला निवेदन : रेल्वे अतिक्रमणग्रस्तांच्या पुर्नवसनासह विविध मागण्या


भुसावळ : तालुक्यातील मांडवेदिगर येथील आदिवासी पावरा समाजबांधवांना रेशनकार्ड मिळावे, चार वर्षांपासून रेल्वे अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेघर झालेल्यांचे पुर्नवसन करावे, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी जय मातृभूमी पक्षाने मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जय मातृभूमी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.भुपेश बाविस्कर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

विविध मागण्यांसाठी मोर्चा
मांडवेदिगर व इतर गावांतील आदिवासी पावरा बांधवांना रेशनकार्ड मिळत नाही. त्यांना रहिवासी दाखला, आधार कार्डासाठी संघर्ष करावा लागतो यामुळे मुलांच्या शिक्षणाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. यामुळे या बांधवांना रेशनकार्ड व योजनांचा लाभ मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी जय मातृभूमी पक्षाने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील नाहाटा महाविद्यालयापासून मोर्चाला सुरवात झाली. या मोर्चात पालखीत संविधानाच्या प्रती ठेवण्यात आल्या. प्रांताधिकारी कार्यालयावर या मोर्चाचा समारोप झाला. शहरातील चार वर्षांपासून रेल्वे अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेघर झालेल्यांचे पुर्नवसन करावे, नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना भरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.



यांचा मोर्चात सहभाग
मोर्चात जय मातृभूमी पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड.भूपेश बाविस्कर, सचिव अ‍ॅड. सचिन कोष्टी, अ‍ॅड.योगेश दलाल, किरण बोलके, अ‍ॅड.मुकेश चौधरी, अ‍ॅड.नितीन भावसार, अ‍ॅड.शकिल खान, दिलीप जोनवाल, हेमंत खरात, दारासिंग बारेला, निलेश पाठक, अ‍ॅड.राजेश वर्मा, अ‍ॅड.आर.टी.पटेल, अ‍ॅड. प्रशांत जाधव आदींसह मांडवेदिगर पाड्यातील आदिवासी बांधव, शेतकरी, अतिक्रमण बाधीत नागरीक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !