रूईखेड्यातील अवैध दारू कारखान्यातील संशयीतांची जळगाव कारागृहात रवानगी


Suspects in illegal liquor factory in Ruikheda sent to Jalgaon jail भुसावळ : मुक्ताईनगर तालुक्यातील रूईखेडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैधरीत्या सुरू असलेल्या मद्याचा कारखाना नष्ट करीत तीन संशयीतांना अटक केली होती. तिन्ही संशयीतांची पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही संशयीतांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

तीनही संशयीत कोठडीत
रूईखेडा येथे मंगळवार, 22 रोजी रात्री 12.30 वाजता छापा टाकून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात विशाल खाचणे, किनय चौधरी, योगेश पाटील या तीन संशयीतांना अटक करण्यात आल्यानंतर संशयीतांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली मात्र ही मुदत सोमवारी संपल्याने तीन्ही संशयीतांना न्यायालयाने 9 डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली. दरम्यान, दोन्ही पसार असलेल्या संशयीतांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांकडून शोध सुरू असल्याचे निरीक्षक सुजीत कपाटे म्हणाले.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !