नायगाव येथील खळ्यातून पशूधनाची चोरी
Theft of livestock from the barn at Naigaon यावल : तालुक्यातील नायगाव येथील खळ्यातून चोरट्यांनी पाच हजार रुपये किंमतीचा बैल लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पशूधन चोरीने शेतकरी त्रस्त
शेतकरी डिगंबर प्रकाश पाटील (34, नायगाव) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा नायगाव गावातील ग्रामपंचायतील पशूधन बांधण्यासाठी खळा आहे. या खळ्यात 28 वर्षीय पांढर्या शिंगाचा व चार हजार नऊशे रुपये किंंमतीचा बैल बांधला असता चोरट्यांनी 26 रोजी सायंकाळी ते 27 रोजीच्या पहाटे लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर यावल पोलिसात शेतकर्याने तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रवींद्र पाटील करीत आहेत.


