जनतेचे आशीर्वाद जनसेवेसाठी बळ देतात : अ‍ॅड.रोहिणी खडसे

अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव


मुक्ताईनगर : आपल्या सर्वांचे प्रेम शुभेच्छा आशिर्वादाने भारावून गेली आहे हे जनतेचे आशीर्वाद प्रेम व जनसेवेसाठी बळ देतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी जरी पराभव झाला तरी तुमच्या सर्वांच्या प्रेम आशिर्वादाने जनसेवेचे बळ मिळाले त्याच जोरावर जनसंवाद यात्रेला सुरुवात करून मुक्ताईनगर मतदारसंघातील गाव खेड्यात जाऊन जनते सोबत संवाद साधल्याचे अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या. रोहिणी यांचा गुरुवारी वाढदिवस असल्याने त्यांच्यावर दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस व रेड प्लस ब्लड जळगावच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात दिडशे रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

फार्म हाऊसवर लाडू तुला
खडसे फार्म हाऊसवर भोटा ग्रामस्थांच्या वतीने अ‍ॅड.रोहिणी खडसे यांची लाडूतुला करण्यात आली. यावेळी मुक्ताईनगर तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायत वढोदा येथील उपसरपंच रंजना कोथळकर यांनी आपल्या समर्थकांसह आणि पंचाने येथील शिंदे गट व भाजप पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नगरसेवक मस्तान कुरेशी यांच्यातर्फे रोहिणी खडसे यांची लाडूतुला करण्यात आली. निलेश भालेराव यांच्यातर्फे अन्नदान करण्यात आले. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीतर्फे जे.ई.स्कुल येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याशिवाय विविध लोकोपयोगी कार्यक्रमांनी रोहिणी खडसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अजय बढे यांच्यातर्फे ३९ किलोचा केक कापण्यात आला. अखिल चौधरी यांच्यातर्फे तीन क्विंटल फुलांच्या पुष्पहाराद्वारे रोहिणी खडसे यांचा सत्कार करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पक्षाच्या वतीने रोहिणी खडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, वक्ता सेलचे विशाल खोले महाराज, दीपक पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, बोदवड तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, बबलू सापधरे, प्रवीण पाटील, निलेश पाटील, विलास धायडे, राजेंद्र माळी, प्रशांत भालशंकर, विनोद काटे, नंदकिशोर हिरोळे, सुनील काटे, मस्तान कुरेशी, बापू ससाणे आदी पदाधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रत्येक जवाबदारी नेटाने पार पाडली : खडसे
एकनाथराव खडसे म्हणाले की, रोहिणी खडसे यांनी आतापर्यंत जी जवाबदारी स्वीकारली ती यशस्वीपणे पार पाडली. मुक्ताई सहकारी सूतगिरणी सुरू करून दाखवली. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी असताना बँकेला अ वर्गात आणले.साखर कारखाना, मुक्ताई एज्युकेशन सोसायटी, नाट्यपरीषद अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली. विधानसभेत थोड्या मतांनी पराभूत झाल्या तरी खचून न जाता आपले कार्य कायम सुरू ठेवले आहे. जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले की, सहकार, राजकारण, शिक्षण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करणारे चतुरस्त्र नेतृत्व म्हणजे रोहिणी खडसे या आहेत.


कॉपी करू नका.