अट्टल घरफोड्यास बेड्या : जळगाव एलसीबीची कामगिरी


Attal Gharfodyas Bedya : Performance of Jalgaon LCB जळगाव : अट्टल घरफोड्याच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या आहेत. इस्तीयाक अली राजीक अली (१९, रा.तांबापुरा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत आरोपीने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

घरफोडी प्रकरणी दाखल होता गुन्हा
रामानंदच्या हद्दीतील घरफोडी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार इस्तीयाक अली राजीक अली (रा. तांबापुरा जळगाव) याने त्याचे साथीदारासह केल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. घरफोडीत घराच्या गोदामाचा कडी-कोंडा तोडून सोन्याचे चांदीचे वापरते दागिणे, लॅपटॉप, मोबाईलची लांबवण्यात आला होता.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !