व्यावसायीक स्पर्धेतून तरुणाचा कोयत्याने वार करून खून


पिंपरी : पूर्ववैमनस्य आणि व्यावसायिक स्पर्धेतून परशुराम चौक, चिंचवड येथे शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास विशाल नागू गायकवाड (रा. मोरेवस्ती, चिखली) या तरुणाचा खून करण्यात आला. १८ जणांनी तरुणावर कोयत्याने सपासप वार करत खून केला शिवाय दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला.

पाच संशयीताना अटक
पोलिसांनी या प्रकरणी राजू मरीबा कांबळे, सिद्धया मरिबा कांबळे, कच्चा उर्फ मिलिंद मरिबा कांबळे (सर्व रा. फुलेनगर, चिंचवड), करण ससाणे, मोहन विटकर यांना अटक केली असून न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्यासह दाद्या उर्फ विशाल मरिबा कांबळे (रा. फुलेनगर, चिंचवड), विशाल लष्करे (रा. रामनगर, चिंचवड), करण उर्फ ससा, सीजे उर्फ चैतन्य जावीर, ओमकार शिंदे, यश कुसाळकर, करण गायकवाड, रोहित मांजरेकर, सुरज मोहिते, नीलेश लष्करे, बालाजी कोकाटे आणि दोन ते तीन अनोळखी इसमांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयताचा मोठा भाऊ अर्जुन गायकवाड (३२) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !