भुसावळातील राजेश्वर नगरातून सीसीटीव्हीसह डीव्हीआर लांबवला


CCTV along with DVR extended from Rajeshwar Nagar in Bhusawal भुसावळ : शहरातील राजेश्वर नगरातील शुभम अपार्टमेंटमधून चोरट्यांनी सीसीटीव्हीसह डीव्हीआर लांबवल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
तक्रारदार संजय सुखलाल चौधरी (47, शारदा कॉलनी, जळगाव) हे राका कन्स्ट्रक्शनमध्ये अभियंता आहेत. संंबंधित कन्स्ट्रक्शनने राजेश्वर नगरात शुभम अपार्टमेंटची निर्मिती केली असून चोरट्यांनी या अपार्टमेंटमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लावलेले सीसीव्टीव्हीसह कॅमेर्‍याचा डीसीआर लांबवल्याची बाब शनिवार, 3 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक तेजस पारीस्कर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !