तरुण तिसर्‍या मजल्यावर चढला अन् अचानक मारली उडी : जळगावात खळबळ


A youth committed suicide by jumping from the third floor in Jalgaon’s Trimbaknagar जळगाव : बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारत जळगावच्या समता नगरातील तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कांतीलाल मोहन पवार (28, समतानगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
कांतीलाल हा आई, पत्नी व तीन वर्षीय मुलासह वास्तव्यास होता व हातमजुरीचे करून आपला उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी दुपारी चार वाजता आईसोबत कामावरून येत असताना दुकानावर जाता,े असे आईला सांगून गेला. त्यानंतर महाबळ रस्त्यावरील त्र्यंबकनगरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून त्याने उडी घेत आत्महत्या केली.



कुटुंबियांचा आक्रोश
तरुणाने उंचावरून उडी मारताच त्याचाचा मृत्यू ओढवला. रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन विसपुते यांनी मयत घोषित केले. कांतीलालने आत्महत्या का केली याचे कारण मात्र कळू शकले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आई व बहिणीचा अक्रोश उपस्थितांचा मन हेलावणारा होता. कांतीलालया पश्चात आई उषाबाई, पत्नी राणी, मुलगा जयेश (3) आणि तीन बहिणी असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !