मालवाहतूक करणार्‍या वाहनाच्या धडकेने ओमनीतील चालक ठार


Accident between two four-wheelers near Pimpripada fork: Omni driver killed on the spot, one critical नंदुरबार : अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावरील पिंप्रीपाडा फाट्याजवळ मालवाहतूक करणार्‍या टाटा कंपनीच्या वाहनाने ओमनी कारला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला. या प्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात ओमनीचे नुकसान
अंकलेश्वर तालुक्यातील भडकोदरा येथील नितीन लक्ष्मण सोमवंशी हे त्यांच्या ताब्यातील ओमनी कार (क्र.जी.जे.16 बीजी 5919) ने विजय पंडीत मोतीराया यांना बसवून शिरपूरकडून अंकलेश्वरकडे जात असताना धर्मेंद्रकुमार यादव यांनी त्यांच्या ताब्यातील (जी.जे.05 सीयू 0863) वरील वाहन चालकाने अचानक रॉँग साईडने वाहन चालवून ओमनी कारला पिंप्रीपाडा फाट्याजवळ धडक दिली. या अपघातात नितीन सोमवंशी हे ठार तर विजय मोतीराया यांना दुखापत झाली. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत विजय मोतीराया यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात धर्मेंद्र श्रीकाशिनाथ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर कोळी करीत आहेत.


कॉपी करू नका.