कुर्‍हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेस तृतीय सुधारीत मान्यता

खासदार रक्षा खडसे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन


Approval of Third Amendment to Kurha-Wadhoda Islampur Subsoil Irrigation Scheme मुक्ताईनगर : कुर्‍हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेस तृतीय सुधारीत मान्यता देण्यासह महाकाय योजनेच्या पुर्नभरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दर्शवली आहे. या संदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी भेट घेवून मागणी केली आहे.

तीन लाख हेक्टर क्षेत्राला होणार लाभ
तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत कुर्‍हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना सिंचन क्षेत्र 25 हजार 898 हेक्टर असून त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील आठ हजार 331 हेक्टर व बुलढाणा जिल्ह्यातील 17 हजार 567 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

बझाडा झोनमध्ये पाणी जिरणार
महाराष्ट्र व मध्यप्रदेश आंतरराज्यीय प्रकल्प असलेल्या महाकाय पुनर्भरण योजना सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बझाडा झोनमध्ये पाणी जिरवून त्याद्वारे या भागातील अत्यंत खालावलेल्या भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करण्याचा हा महत्वकांशी प्रकल्प आहे. त्याद्वारे महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यातील तीन लाख नऊ हजार 788 हेक्टर ऐवढ्या क्षेत्रास लाभ होणार आहे. दरम्यान, दोन्ही योजनांना मार्गी लावण्याबाबत खासदार खडसे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून मागणी केल्यानंतर त्यांनी मंजुरीचे आश्वासन देत जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव यांना आदेशदेखील दिले आहेत.


कॉपी करू नका.