उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मंत्री मंडळ बदलाचे संकेत ; दिवाळीपूर्वी होणार विस्तार !


मुंबई (5 मे 2026) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी निर्णायक पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त आहे. या संभाव्य बदलांमुळे सध्या मंत्रिपदावर असलेल्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

प्रभावी कामगिरी न करणार्‍यांना मिळणार डच्चू
गेल्या अडीच वर्षांच्या काळात काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सर्व मंत्र्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. या अहवालाच्या आधारेच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे समजते. ज्या मंत्र्यांनी आपल्या खात्यात प्रभावी कामगिरी दाखवली नाही किंवा पक्षाच्या विस्तारासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत, अशा मंत्र्यांना पदावरून दूर करण्याची शक्यता आहे.



तर पक्ष संघटनेत नवीन जवाबदार्‍या
राजकीय सूत्रांच्या मते, कामगिरीत कमी पडलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाईल, मात्र त्यांना पूर्णपणे बाजूला न करता पक्ष संघटनेत नवीन जबाबदार्‍या दिल्या जाऊ शकतात. यामागील उद्देश म्हणजे पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढवणे आणि कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे हा आहे. त्यामुळे काही नेत्यांसाठी हा बदल धक्का असला तरी काहींसाठी तो नवी संधी ठरू शकतो.

या फेरबदलात नव्या चेहर्‍यांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या राज्यमंत्री म्हणून काम करणार्‍या काही नेत्यांना कॅबिनेट पदावर बढती मिळू शकते. आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात प्रभावी कामगिरी करणार्‍या आमदारांनाही पहिल्यांदाच मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक आमदारांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा वाढल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !