धरणगाव तालुक्यातील तरुणीवर बलात्कार : पीडीता गर्भवती : तरुणाविरोधात गुन्हा


Rape of young woman in Dharangaon taluka: Victim pregnant: Crime against young man धरणगाव : धरणगाव तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी सलगी वाढवून 35 वर्षीय तरुणाने वारंवार शारीरीक संबंध प्रस्थापीत केल्याने तरुणी त्यातून गर्भवती राहिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अत्याचारातून पीडीता गर्भवती
धरणगाव तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख गावातील विक्की रवींद्र कोळी (35) यांच्याशी सहा महिन्यांपूर्वी झाली होती. ओळखीचा गैरफायदा घेत विक्कीने अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार केल्याने त्यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्या भावाला मारेल, अशी धमकी पीडित मुलीला दिली. या प्रकरणी पीडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !