महामार्गावर भरधाव चारचाकीने दुचाकीला उडवले : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा भुसावळातील विद्यार्थी ठार


A speeding four-wheeler blew up a two-wheeler on the highway: A student of Bhusawal, who was studying engineering, was killed भुसावळ : शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर बंद असलेल्या फेकरी टोल नाक्यानजीक वरणगावकडून भुसावळकडै घरी येत असलेल्या यश वाणी (20) या युवकाच्या दुचाकीला समोरून येणार्‍या भरधाव चारचाकीने उडवल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

अपघाताने शहरात शोककळा
भुसावळ शहरातील व्ही.एम. वॉर्डातील रहिवासी असलेला यश विनोद वाणी (20) हा युवक वरणगावकडून भुसावळकडे दुचाकीने येत असतांना समोरून येणार्‍या कारने दुचाकीला उडवल्याने यशचा जागीच मृत्यू झाला तर शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये हलवल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. यश हा कुटुंबातील एकमेव मुलगा असल्याने अपघाताचे वृत्त कळताच कुटुंबांने टाहो फोडला.

तालुका पोलिसात गुन्हा
मयत यशच्या पश्चात आई-वडिल, बहिण असा परीवार आहे. यश हा जळगाव येथे इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या अपघाताचे वृत्त कळताच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, देवा वाणी यांनी अपघातस्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघाताला कारणीभूत वाहनाची धडक इतकी जोरदार होते की त्यात यशच्या दुचाकीचे दोन तुकडे झाले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.