आगामी निवडणुका जनसामान्यांच्या हक्कासाठी लढा

आमदार शिरिष चौधरी : यावल शहरातील शेतकी संघात काँग्रेसची बैठक


यावल : मी माझ्या स्वार्थासाठी, माझ्या प्रतिष्ठेसाठी लढत नाही तर मी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत आहे, अशा भावनेतून आपल्याला आगामी निवडणुका लढवायच्या आहे, असे आवाहन आमदार शिरिष चौधरी यांनी केले. यावल येथील शेतकी संघात आयेजित काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते.

यावलला काँग्रेसची बैठक
यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात तालुका काँग्रेस कमिटीची बैठक आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आगामी जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगरपरीषद व ग्रामपंचायत निवडणुका संदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले हे निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्याकरीता आगामी शनिवार, 10 डिसेंबर रोजी येत असल्याने तालुक्यातील तयारीबाबतचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परीषदेचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती नितीन चौधरी, जिल्हा बँक संचालक विनोद देशमुख, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, शहराध्यक्ष कदीर खान, जावेद सैय्यद, फैजपूर शहराध्यक्ष रीयाज शेख, माजी नगरसेवक कलिम मन्यार, यावल नगरपालिकेचे माजी गटनेता सैय्यद युनूस, रसूल शेख, शेख असलम, समीर मोमीन, समीर खान, संदीप सोनवणे, मनोहर सोनवणे, संघाचे चेअरमन अमोल भिरुड, धनंजय चौधरी, अनिल पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, अनिल जंजाळे, विवेक सोनार, फैजान शाह, सुनील फिरके, विक्की गजरे, उमेश जावळे, अशपाक शाह, जी.पी पाटील, इम्रान पहेलवान, उस्मान तडवी, प्रशांत पाटील, चंद्रकला इंगळे, विक्की पाटील, कलिमा तडवी,महेश राणे, विक्की सोनवणे, शेख सकलेन, सरफराज शाहसह काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.