भुसावळातील नाहाटा महाविद्यालय नॅकच्या चौथ्या सायकलसाठी सज्ज

तयारी पूर्णत्वाकडे : यापूर्वी महाविद्यालयाला तिन्ही सायकलमध्ये मिळाली ग्रेड


भुसावळ : ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचालित भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयास नॅक बेंगलोर, महाविद्यालयाची गुणवत्ता तपासणीसाठी येणार आहे. हे महाविद्यालय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत नॅकच्या चौथ्या सायकलसाठी सामोरे जात आहे. या आधी महाविद्यालयाला तिन्ही सायकलमध्ये – ग्रेड मिळाली आहे.

नॅकच्या सूचनेप्रमाणे सुविधा
महाविद्यालयात नॅकने सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी सर्व सुखसुविधा संस्थेने उपलब्ध करून दिल्या असून महाविद्यालयात आयसीई अ‍ॅनेबल 16 वर्ग खोल्या आहे व चवार स्मार्ट क्लास रूम आहे. समृद्ध असे ग्रंथालय असून एक लाखाच्यावर विषयाचे पुस्तके त्याचप्रमाणे संदर्भ पुस्तके उपलब्ध आहे. महाविद्यालयात पदवी स्तरावर 11 व पदव्युत्तर स्तरावर 17 वेगवेगळ्या कोर्सेसचे वर्ग चालवले जातात. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिमखाना, सांस्कृतिक विभाग, इंक्युबॅशन सेंटर यासारखे असंख्य सुविधा पुरवल्या आहेत. महाविद्यालयात विद्यापीठात मान्यता असलेले पाच संशोधन केंद्र आहे, त्यात एकूण 100 विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत. यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयातील प्राध्यापक मार्गदर्शक म्हणून नेमलेले असून त्यांची संख्या सुमारे 25 आहे.



चर्चासत्रासह राष्ट्रीय परीषदांचे आयोजन
महाविद्यालयीन प्राध्यापकांना त्यांच्या संशोधक कार्यात मदत करण्यासाठी अनेक चर्चासत्र व राष्ट्रीय परिषदा संस्थेमार्फत आयोजित करण्यास मदत होते. महाविद्यालय स्तरावर सुद्धा अनेक चर्चासत्र, सेमिनार, राष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या जातात. महाविद्यालयामध्ये प्राध्यापक दरवर्षी नामांकित संशोधन पत्रिकेत त्यांचे संशोधन निबंध प्रकाशीत करतात. महाविद्यालयाने वेगवेगळ्या समितीमार्फत युवती सभा, विद्यार्थी कल्याण विभाग, छडड, छउउ, डिेीीं सारखे उपक्रम राबवले जातात. विद्यार्थिनीसाठी महाविद्यालयाने महिला रूम, महिला विश्रामगृह उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा विश्रामगृह उपलब्ध केलेले आहे. याशिवाय महाविद्यालयाच्या परिसरात महाविद्यालयाची एक प्रशस्त अशी कॅन्टींग, सायकल स्टॅन्ड उपलब्ध आहे.

महाविद्यालयात इंटरनेट सुविधा
महाविद्यालयाच्या प्रत्येक विभाग हा इंटरनेटने जोडला गेलेला आहे. अशाप्रकारे अनेक सुविधा महाविद्यालयात सध्या उपलब्ध आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत शैक्षणिक विकाससाठी पालक शिक्षक संघ, माजी विद्यार्थी संघटना कार्यरत आहे. याशिवाय प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांची क्रेडिट सोसायटी आहे. विद्यार्थ्यांना माहिती अर्ज व माहिती पुस्तिका उपलब्ध करुन घ्यावी म्हणून विद्यार्थ्यांसाठी ग्राहक भंडार आणि वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध आहे. या संपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे श्रेय ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमारजी नाहाटा आणि सन्माननीय संचालक मंडळ यांचे आहे.

यशस्वीतेसाठी यांचे सहकार्य
या संपूर्ण नॅकच्या कार्यासाठी प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली नॅक समितीने समन्वयक उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.ए.डी. गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, सर्व क्रायटेरिया प्रमुख, डी.व्ही.व्ही प्रमुख, क्रायटेरिया सदस्य, स्टेरिंग कमिटी सदस्य तसेच महाविद्यालयीन कार्यालय व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !