भुसावळातील अंतर्नादतर्फे पुष्पांजली प्रबोधनमालेचे आयोजन
दोन दिवस आयोजन : प्रथम पुष्प प्रा.विजया मारोतकर, द्वितीय पुष्प अनंत राऊत गुंफणार
भुसावळ : शहरात माजी खासदार कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे व स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुष्पांजली प्रबोधनमाला आयोजित करण्यात आली असून त्यात सोमवार, 12 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता तर बुधवार, 14 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता असे दोन दिवस अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या सभागृहात वक्त्यांची व्याख्याने होतील.
‘पोरी जरा जपून’ विषयावर सोमवारी व्याख्यान
प्रबोधनमालेचे प्रथम पुष्प सोमवार, 12 डिसेंबर रोजी नागपूर येथील प्रा.विजया मारोतकर या गुंफतील. ‘पोरी जरा जपून’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. त्यांचे आतापर्यंत या विषयावर असंख्य व्याख्याने झाली आहे. वैचारीक विषयांवर त्यांची 35 पुस्तके प्रकाशित आहेत. पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. द्वितीय पुष्प बुधवार, 14 डिसेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील व्याळा येथील अनंत राऊत हे गुंफतील. ‘आनंदाचे शोधावे घर दु:खाच्याही छाताडावर’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. कवी, लेखक, गीतकार, मोटीव्हेशनल स्पीकर आहेत. ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’ या कवितेने खेड्यापाड्यातील रसिकांच्या हृदयसिंहासनावर ते अधिराज्य गाजवत आहेत. अशा दोन्ही वक्त्यांची व्याख्याने बोचर्या थंडीत ऐकण्याची संधी भुसावळकरांना मिळणार आहे. उद्योजक अजय बढे, अमोल हरिभाऊ जावळे, यजुवेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनात ही प्रबोधनमाला होत आहे. प्रकल्पप्रमुख म्हणून प्रसन्ना बोरोले, समन्वयक संजू भटकर, सहसमन्वयक ज्ञानेश्वर घुले आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या कल्पकतेतून हा सांस्कृतिक उपक्रम राबवला जातो आहे. रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष
दरवर्षी ही प्रबोधनमाला भुसावळ शहर व परीसरातील शाळांमध्ये फिरती व्हायची. उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहरात सार्वजनिकरित्या हॉलमध्ये जाहीर व्याख्यानमाला होत नाही. त्यामुळे अभिरूची टिकून राहावी म्हणून या वर्षी ही प्रबोधनमाला सायंकाळी सभागृहात होत आहे, असे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगीतले.
आजपर्यंत यांची झाली व्याख्याने
चांदवडचे विष्णू थोरे, नाशिकचे प्रमोद अंबडकर, एरंडोलचे प्रा. वा. ना. आंधळे, चाळीसगावचे मनोहर आंधळे, धरणगावचे डॉ. संजीवकुमार सोनवणे, वाशिमच्या उज्ज्वला मोरे, भुसावळचे जीवन महाजन, पुण्याचे देवा झिंजाड, अमरावतीचे नितीन देशमुख, सोलापूरचे नितीन चंदनशिवे , जळगावचे मनोज गोविंदवार, पाचोर्याचे रवींद्र पाटील अशा अनेक दिग्गज वक्त्यांची व्याख्याने या प्रबोधनमालेत आजपर्यंत झाली आहेत.
नियोजन समितीचे गठण
प्रदीप सोनवणे, योगेश इंगळे, जीवन महाजन, अमितकुमार पाटील, विक्रांत चौधरी, शैलेंद्र महाजन, समाधान जाधव, भूषण झोपे,अमित चौधरी, राजेंद्र जावळे, राजू वारके, कुंदन वायकोळे, देव सरकटे, प्रा.श्याम दुसाने, निवृत्ती पाटील, जीवन सपकाळे, हरीश भट, संदीप रायभोळे, प्रमोद पाटील, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, मंगेश भावे, राहुल भारंबे, ललित महाजन, गणेश जावळे