चाळीसगाव तालुक्यात मूकबधीर तरुणीवर अत्याचार : आरोपीला अखेर बेड्या


चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका गावाजवळ निर्जन जागी मूकबधीर तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या प्रकरणी तिघांविरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पीडीतेने सांगितलेल्या वर्णनावरून स्केच तयार करण्यात आल्यानंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. प्रताप भीमसिंग ठाकरे (31, कुंझर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीला शनिवारी दुपारी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तलावाजवळ नेत केला अत्याचार
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 25 वर्षीय मूकबधिर तरुणीला तीन अनोळखी संशयीतांनी रविवारी रात्री आठ वाजता दुचाकीवरून बसवून तिला गावाजवळील तलावाजवळ नेत दोघांनी मारहाण केल्यानंतर तिसर्‍या आरोपीने अत्याचार केला होता. रविवार रात्री आठ ते सोमवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेला आधी ग्रामीण रुग्णालयात तेथून धुळे येथे शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते.



स्केचवरून लागला आरोपीचा शोध
पीडिता मूकबधीर असल्यामुळे व ती गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी तिचा जबाब घेण्यासाठी विशेष शिक्षिकेला पाचारण केले. विशेष शिक्षिकेसमोर इशार्‍याने पीडितेने आपल्यावरील आपबित्तीचा सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार गावातीलच तीन अनोळखी लोकांनी दुचाकीवरून तिला गावाजवळील तलावाजवळ नेल्याचे उघड झाले होते. दोघा आरोपींनी पीडीतेला डोळ्यावर मारहाण केली होती तर एका नराधमाने पीडीतेने अत्याचार केला होता. पीडितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !