परधाडे रेल्वे स्थानकाजवळ : रेल्वेखाली आल्याने अनोळखीचा मृत्यू


Near Pardhade Railway Station: Death of a stranger after falling under the train पाचोरा : पाचोरा तालुक्यातील तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ रविवार, 11 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा धावत्या रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांनी घेतली धाव
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे हवालदार नरेंद्र नलवाडे, नरेंद्र शिंदे, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. मयतची ओळख पटली नसून रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने मयतास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत अनोळखी इसमाच्या नातेवाईकांचा शोध पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. स.आय.ज्ञानेश्वर पाटील घेत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !