जळगावातील तरुणाचा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून : दोघांना अटक


Murder of youth in Jalgaon on suspicion of immoral relationship: Two arrested जळगाव : जळगावच्या मेहरुण भागातील तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत दोघा आरोपींना अटक केली आहे. आरोपीच्या पत्नीशी मयताचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (33, रा.जयभवानी नगर, मेहरूण) या तरुणाच्या खून प्रकरणी सत्यराज नितीन गायकवाड (26, रा.गणेश नगर, जळगाव) व सुनील लियामतखाँ तडवी (26, पंचशील नगर, फुकटपुरा, तांबापुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

मयत हरवल्याची एमआयडीसी पोलिसात नोंद
प्रमोद हा जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव) येथे शनिवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामासाठी गेला होता. प्रमोद विद्यापीठात कंत्राटी तत्वावर काम करीत होता. परंतू तो सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरी आला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शोध घ्यायला सुरुवात केली परंतू कुठेही प्रमोदचा तपास लागला नाही. त्यामुळे रविवार, 11 डिसेंबर रोजी वडील सुरेश हरी शेट्टी,( वय 63 वर्ष, रा. जयभवानी नगर, मेहरुण) यांनी एम. आय. डी. सी. पो.स्टे. ला हरविल्याबाबत तक्रार दाखल केली होती.



मृतदेह आढळून आल्यानंतर उडाली खळबळ
तरुणाचा मृतदेह सोमवार, 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील निमखेडी शिवारातील कचरा फॅक्टरीच्या लगत असलेल्या महादेव मंदीराच्या मागील बाजुस एका अनोळखी इसमाचे प्रेत मिळून आल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी सुरेश शेट्टी यांनी जावून सदरचे प्रेत हे त्यांचा मुलगा प्रमोदचे असल्याचे ओळखले होते. प्रमोदचा खून झाल्याचे परिस्थितीजण्य पुराव्यावरुन दिसत असल्यामुळे जळगाव तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अनैतिक संबंधाच्या संशयातून खून
आरोपी सुनील तडवी याच्या पत्नीशी मयताचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला असल्याने त्याने सत्यराज नितीन गायकवाड (26 वर्ष, रा. गणेश नगर, जळगाव) याची मदत घेत तरुणाचा खून केला. संशयीत उमाळा (ता.जि. जळगाव) शिवारात असलेल्या जंगलात लपून बसल्याची माहिती जळगाव एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शोध पथकाचे एएएसआय अतुल वंजारी, सुधीर सावळे, किशोर पाटील, इम्रान सैय्यद, हेमंत कळकसर, छंगन तायडे, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, योगेश बारी, गोविंदा पाटील यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मोठ्या दगडाने ठेचले डोके
प्रमोदचा गळा समोरून धारदार हत्याराने कापलेला होता. तसेच दोन्ही हातांवर ठिकठिकाणी व पाठीवर दोन ठिकाणी तसेच मानेवर कापीव व खोल गंभीर जखमा दिसत होत्या तसेच त्याचे डोके मोठ्या दगडाने ठेचले े होते. त्याचा संपूर्ण चेहरा व अंगावरील कपडे रक्ताने माखलेले होते. त्यामुळे प्रमोदचा खून अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.

अनैतिक संबंधाच्या संशयाने केला घात
सुमारे दोन वर्षापूर्वी प्रमोदच्या घरच्यांनी सुनील तडवी यास घर भाडयाने दिले होते. त्याच्या घरी सत्यराज गायकवाड हा नेहमी ये-जा करीत होता परंतु सहा महिन्यांपूर्वी सुनील याने प्रमोद याच्याशी, तु माझ्या पत्नीशी का बोलतो?. तिच्याकडे का पाहतो?, या कारणावरून भांडण केले होते. तसेच त्यानेच याबाबत एमआयडीसी पोलीसांत प्रमोदविरुध्द तक्रार दिली होती. दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. त्यामुळे प्रमोदच्या घरच्यांनी सुनील याच्याकडून सहा महिन्यांपुर्वीच घर खाली करून घेतले होते. तेव्हापासून सुनील हा प्रमोद याच्यावर खुन्नस ठेवून होता. एवढेच नव्हे तर तर अधुन-मधून सुनील व त्याचा मित्र सत्यराज गायकवाड असे दोघेजण आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी देवून खुन्नस देत असतात, असे प्रमोदने आपल्याला वडिलांना सांगितले होते.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !