घराच्या छताला गळफास लावत वृद्धाची आत्महत्या : पाचोरा तालुक्यातील घटना


Suicide of an old man by hanging himself from the roof of the house: an incident in Pachora taluka पाचोरा : पाचोरा तालुक्यातील बांबरुड (महादेवाचे) येथे एका 65 वर्षीय वृद्धाने घराच्या छताला गळफास लावत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवार, 12 डिसेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुकलाल नामदेव बागुल (65) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
बागुल यांनी सोमवार, 12 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास लावत आपली जीवनयात्रा संपवली. हा प्रकार नातेवाईक व ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले. पाचोरा येथील रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी सुकलाल बागुल यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. सुकलाल बागुल यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अशोक पाटील करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !