भुसावळ तालुक्यातील खेळाडूचे राज्य पातळीवर यश
भुसावळ : उस्मानाबाद येथे झालेल्या 23 वयोगट राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत भुसावळ तालुक्यातील खेळाडू गौरी कृष्णा लोहार हिने थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले. 4400 मीटर रीले स्पर्धेत तालुक्यातील दिग्वीजय दिलीप दाभाडे, गौरव बाळू भारुडे, सचिन राजु तायडे, सुनील निळकंठ कोळी यांनी द्वितीय क्रमांक मिळवीत रौप्य पदक पटकाविले. या खेळाडूंना इरफान शेख यांनी मार्गदर्शन केले.
खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव
भुसावळ तालुका अॅथलेटीक्स असोसिएशनतर्फे चंद्रकांत निकम, रवींद्र चोपडे, गोपीसिंग राजपूत, योगेंद्र हरणे, राहुल महाजन, ममता जांगीड, संजय शिरसाठ, डॅनियल पवार, मयूर घेंगट, संजय गादे, रमण भोळे, जयप्रकाश शुक्ला आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.


