भुसावळातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे मूल्यसंस्कार व्यक्तिमत्व विकास शिबिर


भुसावळ : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक (दिंडोरी प्रणीत) व प.पू.गुरुमाउली यांच्या आशिर्वादाने गुरुपुत्र आमदार चंद्रकांत मोरे, आमदार नितीन मोरे, आमदार गणेश आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने एक दिवसीय मूल्यसंस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले. भुसावळ शहर व तालुक्यातून 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्याच प्रमाणे श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग केवळ अध्यात्मिक मार्ग नसून त्यात 20 टक्के अध्यात्म व 80 टक्के सामाजिक कार्याच्या माध्यमातून सत्कर्म परोपकार साधला जातो.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिबिर
या शिबिरात विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास व्हावा व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने विविध बौद्धिक खेळ, मंत्रस्तोत्र पठण, व त्याचे अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्व, क्यूब, कराटे, लाठी-काठी, मिडब्रेन, डोळ्यांवर पट्टी बांधून वस्तू, रंग, थोर व्यक्तीचे चित्र ओळख, सर्व प्रात्यक्षिक कृती करून दाखविण्यात आल्या. त्याच बरोबर पालकांसाठी पालकत्व, गर्भसंस्कार, शिशू संस्कार, बालसंस्कार काळाची गरज तसेच दुपार सत्रात आमदार नितीन मोरे यांचे अनमोल ऑनलाईन मार्गदर्शन लाभले. सेवा मार्गातील 18 ग्राम अभियान, पारंपरीक वस्तू प्रदर्शन टाकाऊपासून टिकाऊ, पर्यावरण पूरक उपक्रम, भगिणीचे 11 अलकारांचे महत्व आदी उपक्रम घेण्यात आले.



या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
चित्रकला स्पर्धेतील नंदिनी कुमार गाडेकर, रांगोळीत वेदांशा विनोद तेजी, जनरल नॉलेज स्पर्धेत स्वयम राकेश तिवारी, हस्ताक्षर स्पर्धेत सार्थकी प्रशांत पाटील, लिंबू चमचा स्पर्धेत प्रांजल मनोज पाटील, गोणपाट उडी स्पर्धेत हेमंत गणेश गोसावी आदींनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थाना सेवा मार्गातील ग्रंथ, विविध फोटोख, संरक्षण यंत्र देवून सन्मानित करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !