भुसावळात वीज ग्राहकांना अवाजवी वीज बिलांचा शॉक
Electricity consumers in Bhusawal shocked by exorbitant electricity bills भुसावळ : भुसावळ शहरात वीज वितरण कंपनीचे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल देऊन ‘शॉक’ देणे सुरू केल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे. कित्येक ग्राहकांचा विजेचा वापर कमी असताना त्यांना बिल मात्र प्रमाणापेक्षाही अधिक देण्यात आल्यचा आरोप आहे. चार ते पाच आकडी बिलाच्या रक्कमेने ग्राहकांना घाम फोडला असून वीज वितरण कंपनी ग्राहकांना लुटल्याचा आरोप ग्राहक करीत आहेत.
शेकडो तक्रारी प्रलंबित
भुसावळ शहरात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. 2019 साली जिनस कंपनीने भुसावळ शहरात आर.एफ.टेक्नॉलॉजीचे मीटर ग्राहकांच्या घरी बळजबरीने बसविले. त्यानंतर अनेक ठिकाणी वीज ग्राहकांना दुसर्याच ग्राहकांच्या नावाचे मीटर बसविण्यात आले आहे अश्या तक्रारी वाढल्यात. अनेक ग्राहकांनी याबाबतीत तक्रार ही दाखल केल्यात परंतु अजूनही भुसावळ विभागातील शेकडो तक्रारी प्रलंबित आहे. वीज बिल सक्तीने वसुली करण्याची मोहिम महावितरणने सुरू केली असून वापर न केलेल्या रीडींगचे वीज देयके अदा करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना त्रास देत असल्याची तक्रार प्रा.धीरज पाटील यांनी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


तीन वर्षांपासून त्रास
भुसावळातील हुडको कॉलोनी परीसरातील वीज ग्राहकाला (117754066908) तीन वर्षांपासून दुसर्याच ग्राहकाचे वीज देयक दिले जात आहे. वारंवार तक्रार दाखल केल्यानंतरही सुधारणा करण्यात आलेली नाही. दुसर्या ग्राहकाचा वापर जास्त आहे आणि आम्ही भाड्याच्या घरात राहतो. वीज देयक कसे भरणार? याची काळजी सतावते. महावितरणच्या कर्मचार्याला विचारणा केली तर जिनस कंपनी सुधारणा करीत नाही , असे ीते सांगतात. जिनस कंपनीच्या अधिकार्याला विचारणा केली असता महावितरण सुधारणा करीत नाही, असे सांगितले जाते. नक्की न्याय मागायचा कोणाला हेच समजत नाहीय? असा प्रश्न तक्रारदार ग्राहक लतेश भारंबे यांनी उपस्थित केला आहे.
