भुसावळातील गजानन नगरात बंद घर फोडले : 70 हजारांच्या ऐवज लंपास


A closed house was broken into in Gajanan town of Bhusawla: Lampas instead of 70 thousand भुसावळ : भुसावळ शहरातील कोटेचा हायस्कूलसमोरील गजानन महाराज नगरातील बंद घरातून चोरट्यांनी 70 हजारांचा ऐजव लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी
नोकरदार राजेश भास्कर पाटील (54, प्लॉट नंबर 14, गजानन महाराज नगर, कोटेचा हायस्कूलजवळ, भुसावळ) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून त्यांच्यासह परीवारातील सदस्य गावाला गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. शुक्रवार, 9 डिसेंबर रोजी रात्री आठ ते सोमवार, 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान बंद घराचे कुलूप तोडून 40 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र तसेच 30 हजार रुपये किंमतीचे चांदीचे भांडे असा एकूण 70 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला.



शहर पोलिसात गुन्हा
पाटील दाम्पत्य गावावरून आल्यानंतर राजेश पाटील यांनी मंगळवार, 13 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता भुसावळ शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय सोनवणे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !