चोरट्यांचा मोर्चा पांढर्या सोन्याकडे : वरणगावातून एक लाखांची कपाशी लांबवली
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव शहरातील पिंपळ मळ्यातून चोरट्यांनी एक लाख रुपये किंमतीची व 25 क्विंटल वजन असलेली कपाशी लांबवली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
तक्रारदार विकीन नारायण भंगाळे यांच्या पिंपळ मळ्याशेजारी वाडा असून चोरट्यांनी 5 ते 13 जानेवारीदरम्यान सुमारे 20 ते 25 क्विंटल वजनाची व एक लाख रुपये किंमतीची कपाशी लांबवली. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.


