शिविगाळ केल्याच्या संशयातून सांगवीत महिलेचा विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा
Woman molested in Sangvi : Crime against both यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील एका 55 वर्षीय महिलेचा मुलगा शिवीगाळ करीत असल्याने आपल्यालाच शिविगाळ होत असल्याच्या संशयावरून गावातील दोघांनी महिलेला मारहाण करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी यावल पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा
सांगवी बुद्रुक, ता.यावल येथील 55 वर्षीय विवाहितेचा मुलगा हा शिविगाळ करीत असल्याच्या संशयातून सतीश मधुकर तायडे व अमोल दगडू वाघ (दोन्ही रा.आंबेडकर नगर, सांगवी बुद्रुक) यांनी पीडीतेच्या मुलासह महिलेशी वाद घालत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघाविरुद्ध विनयभंग सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.

