सांगवी बुद्रुक गावातील ४० वर्षीय महिलेचा विनयभंग : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


यावल : तालुयातील सांगवी बुद्रुक गावात ४० वर्षीय महिला आपल्या घराजवळ असताना संशयीताने अर्धनग्न होत लघूशंका करीत अश्लील हावभाव करीत विनयभंग केल्याने आरोपीसह त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अर्धनग्न होत लघूशंका केली
सांगवी बुद्रुक, ता.यावल येथील ४० वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या आपल्या घराच्या बाहेर आपल्या भाचीसोबत भांडे धूत असतान संशयीत प्रवीण लहू साळुंके (आंबेडकर नगर, सांगवी बुद्रुक) याने अर्धनग्न होत लघूशंका केली व अश्लील हावभाव केले तसेच याबाबत जाब विचारला असता संशयीताची आई छायाबाई लहू साळुंखे याने महिलांना अश्लील शिवीगाळ करून करून त्यांचा विनयभंग करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलि ठाण्यात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंस सह मारहाण करणे व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !