साकळीतील तरुणीचा विनयभंग : मोबाईलवर संदेश पाठवणार्‍या तरुणाविरोधात गुन्हा


यावल : तालुयातील साकळी येथील २० वर्षीय तरुणीचा मोबाईलवर सातत्याने मॅसेज टाकून विनयभंग करण्यात आला. तरुणीने मॅसेज करू नका, सांगितल्यानंतरही संबधीताने अश्लील शब्दात शिविगाळ करीत तिचा विनयभंग केल्याने एका मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल
साकळी २० वर्षीय तरुणीला ९५२९०२२५८५ वरील अज्ञात व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्याने सातत्याने मेसेज पाठवले. तरुणीने याबाबत मॅसेज न पाठवण्यासह नावाबाबत विचारणा केल्यानंतर संशयीताने अश्लील भाषेत शिवीगाळ केली व तिचा विनयभंग केला. या प्रकरणी २० वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात मोबाईल वापरकर्त्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !