सावदा-बर्‍हाणपूर मार्गाचे डीआरएम केडीया यांनी केले निरीक्षण


भुसावळ : भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे प्रबंधक एस.एस.केडीया यांच्यासह सहकार्‍यांनी नुकतेच सावदा-बर्‍हाणपूर मार्गाचे निरीक्षण केले. याप्रसंगी त्यांनी अधिकार्‍यांना काही सूचनाही केल्या. यावेळी भुसावळ विभागात नवीन रुजू झालेले सहायक विभागीय रेल्वे प्रबंधक सुमन, वरीष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक डॉ.शिवराज मानसपुरे, वरीष्ठ विभागीय परीचालन प्रबंधक मीना, वरीष्ठ विभागीय इंजिनिअर उत्तर निश्चित कुमार, वरीष्ठ विभागीय इलेक्ट्रिक इंजिनिअर पालसिंग, सहा. सुरक्षा अधिकारी कुशवाह व इतर अधिकारी उपस्थित होते.

केळी व्यापार्‍यांच्या शंकांचे केले निरसन
आधी सावदा स्टेशनचे डीआरएम केडीया यांनी निरीक्षण केले तसेच नव्याने सुरू करण्यात येणार्‍या गिट्टी सायडिंगचे निरीक्षण व केळी लोडिंग शेड व प्लॅटफॉर्मचे निरीक्षण केल्यानंतर निंभोरा स्टेशनचे निरीक्षण केल्यानंतर अधिकार्‍यांना सूचना करण्यात आले. यावेळी रावेर येथे केळी लोडिंग करणार्‍या व्यापारी यांच्या सोबत बैठक घेण्यात आली व व्यापार्‍यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. रावेरहून निघाल्यानंतर भुसावळ येताना विंडो निरीक्षण करण्यात आली तसेच भुसावळ गुड्स यार्डचे विंडोद्वारे निरीक्षण करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !